महाविकास आघाडीच्या नेतृत्वात अल्लीपुरात शेकडो शेतकऱ्यांचा “सत्याग्रह"

Wed 09-Oct-2024,05:29 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर 

 

      स्थानिक अल्लीपुर येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सत्याग्रह आंदोलन पार पडले या आंदोलनामध्ये शेकडो शेतकऱ्यासह महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची उपस्थिती होती,या आंदोलनातील प्रमुख मागण्या संदर्भात काम सुरू असल्याबाबतची माहिती मंडळ अधिकारी लवणकर व कृषी अधिकनी भगत यांनी यावेळी दिली.

      अल्लीपुरात मंगळवारी महात्मा गांधी व छत्रपती शिवाजी महाराज यांना साक्ष ठेवत सत्याग्रह आंदोलन महाविकास आघाडी व समस्त शेतकऱ्यांच्या वतीने पार पडले यात प्रामुख्याने अल्लीपूर गावाला दोन तलाठी देण्यात यावे,नायब तहसीलदार पदाची निर्मिती करुन अल्लीपूर परिसरासाठी नेमणूक करावी,प्रधानमंत्री सन्मान निधीच्या जाचक अटी रध्द कराव्या,तुषार सिंचन व ठिबक सिंचन चे अनुदान तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे,ई केवायशी सारख्या जाचक अटी रद्द कराव्या,शेतकऱ्यांना २०२३-२४ अतिवृष्टीची मदत ई पीक अट वगळून सरसकट द्यावी,पीक विमा अधिकारी तक्रार करूनही बांधावर न पोहचल्याने त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अश्या विविध शेतकऱ्यांच्या समस्येच्या अनुषंगाने आज आंदोलन करण्यात आले,यातील शासन स्तरावरील मागण्यांचे निवेदन शासनाला पाठविण्याचे आश्वासन देण्यात आले त्यासोबतच जिल्हाधिकारी व उपविभागिय अधिकारी यांचे स्तरावरील अडचणी सोडविण्याची आश्वासन देण्यात आले असून,पुढील महिन्याभरात अल्लीपुर गावाला अतिरिक्त तलाठी देण्याची आश्वस्त केले आहे,या आंदोलनाला प्रामुख्याने उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे इस्माईल का पठाण,प्रभाकर फटिंग,माजी सरपंच गजानन नरड,गोपाल मेघरे,सचिन पारसडे,प्रणय कदम,संदीप किटे,श्रीराम साखरकर,नितीन सेलकर, अजय भगत विजय कवडे,हारून अली,बच्चू वाटखेडे,नितीन वानखेडे,केशवराव कांबळे, तुकारामजी खाडे,कैलास हुलके,संदीप नरड,आशिष लोणारे,रोशन नरड,विकास गोठे,मधुकर काळे,मंगेश कवडे,सचिन गराड,सुनील कवडे,संदीप गावंडे ,विजू केवटी,संजय काळे,बाळू ढोमणे,विनोद कवडे,असलम खा पठाण,पंकज उरकुडे,रामदास मलकापूरे,नाना वांदिले,प्रवीण गोठे,सतीश खोंड, विलास खोंड,स्वप्निल कवडे,खालील कुरेशी,अनिस कुरेशी,गणेश वानखेडे,नाना वानखेडे,अमर वानखेडे,मनोहर मानमोडे,भागवतराव पिसे ,केशवराव चांभारे ,कवडूजी घंगारे, राम कृष्ण साखरकर ,अजय गायकवाड ,सुनील वाघमारे, रामू धनवीज,प्रवीण राऊत,मोरेश्वर वरभे,सुमित भगत,पद्माकर काळे ,दौलत खा पठाण ,अमोल साळवे ,भैय्या गुजरकर,कैलास पिंपळापुरे,धनराज घुसे,अशोक सूरकार,उत्तम घुसे,महिला शेतकरी म्हणून सपना राऊत,सविता साखरकर,जिजा गुजरकर,इंदिरा घंगारे,प्रिया पारसडे व ईतर कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते